About us

KISAN FORUM, has been active in the realm of Agricultural extension for the past 24 years. Our objective is to keep farmers in tune with the latest technologies and to harness emerging opportunities in transforming their lives.

किसान प्रदर्शनाची
प्रगतीपथावर वाटचाल.

किसानचे हे २७ वे प्रदर्शन आहे . भारतीय कृषितील वर्तमान आणि भविष्यातील नवीन संकल्पना व तंत्रज्ञान एकत्रितपणे किसान च्या माध्यमातून अनुभवता येतील.
किसान प्रदर्शनाला दरवर्षी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरून शेतकरी भेट देण्यासाठी येत असतात व दरवर्षी त्याला वाढता प्रतिसाद मिळत आहे.
५ दिवस
१५०,००० + शेतकरी ५०० + कंपन्या फलदायी कनेक्शन ...

किसान २५ व्या वर्षात.

किसानच्या प्रदर्शनाच्या प्रवासामध्ये सहभागी शेतकरी समुदाय आणि शेती उद्योगाचे आम्ही आभारी आहोत.
१९९३ मध्ये किसानने एका विश्वासाने सुरुवात केली की "भारतीय कृषीतील नवीन संकल्पना व तंत्रज्ञानाच्या माहितीचे स्रोत खुले करून एकाच व्यासपीठावर उपलब्ध करून दिल्यास शेतीचे एका सशक्त व्यवसायात रूपांतर होईल." किसान, शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात नवीन संकल्पना राबवून व तंत्रज्ञानाचा वापर करून त्याचा अभ्यास करून पीक कसे घ्यावे याबाबत मार्गदर्शन करत आहे व त्याचा लाभ अनेक शेतकऱ्यांनी घेतला आहे. शेतकऱ्यांनी स्वतःला सर्वात प्रगत तंत्रज्ञानाशी परिचित केले आहे आणि विकसित केलेले ज्ञान वापरून योग्य प्रथा देखील विकसित केल्या आहेत. आता, आम्ही ही ज्ञानाची वाढती भूक आणि सतत बदलणाऱ्या जगात नवीन संधी शोधण्याचा प्रयत्न करीत आहोत.

The Kisan.net app helps you to follow channels of your interest.
Stay up to date with emerging trends in the agriculture industry.

The app also makes booking your Greenpass a lot easier.
Register yourself now and skip the long queues at the entrance!

DOWNLOAD NOW

किसान प्रदर्शनात सहभाग

लाखाहून अधिक प्रेक्षकांपर्यंत

१५०,००० पेक्षाही अधिक शेतकरी, शेती व्यावसायिक, संशोधक ५ दिवस किसान प्रदर्शनाला भेट देतात.
कृषि कंपन्यांशी कनेक्ट राहण्यासाठी आणि व्यवसायाची संधी वाढविण्यासाठी किसान हे सर्वोत्तम व्यासपीठ आहे.

उद्योगाच्या संपर्कात रहा

उद्योगात दिशा जाणून घेण्यासाठी किसान हि एक उत्तम संधी आहे. फक्त शेतकऱ्यांबद्दल न जाणून घेता आपले प्रतिस्पर्धीही अधिक जाणून घ्या.
आपले ग्राहक आणि ते काय शोधत आहेत हे अधिक जाणून घ्या. आपले प्रतिस्पर्धी आणि त्यांच्या प्रगती अधिक जाणून घ्या. या सर्व माहितीच्या आधारे व्यावसायिक स्पर्धेत पुढे राहून आपल्या ग्राहकांना जिंकण्यासाठी मदतच होईल.

आपल्या ब्रॅण्डचा प्रभाव वाढवा

आपला ब्रांड विकसित आणि मजबूत बनवा या साठी किसान एक योग्य व्यासपीठ आहे, जेथे आपण आपली कंपनी किंवा संस्थेच्या ब्रॅण्डचा प्रभाव वाढवू शकता. ग्राहकांच्या मनात आपल्या कंपनी आणि संस्थेविषयीचा विश्वास निर्माण करून द्या.

धोरणात्मक भागीदारी करा

५०० पेक्षा जास्त कंपन्या - लहान, मध्यम आणि मोठ्या दरवर्षी किसानमध्ये सहभागी होतात. किसान, भावी ग्राहक, विक्रेते आणि कंपन्या यांना परस्परांशी संवाद साधण्याची संधी देते तसेच आपल्या व्यवसायाला लागणारे भावी ग्राहक किंवा कंपन्या ओळखण्याची संधी देते.

किसान
भारतातील सर्वात मोठे कृषि प्रदर्शन

१३ - १७ डिसेंबर, २०१७
आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्र, मोशी, पुणे, भारत